मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

“मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी आणखी एक दिवसाची परवानगी“

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्यासाठी आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही परवानगी केवळ आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आश्वासन दिलं की, मराठा समाजाला कोणालाही नाराज न करता, चर्चेच्या माध्यमातून आणि संवैधानिक चौकटीत राहून न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्यात येईल. यासाठी सरकारने मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन केली असून ती आंदोलकांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करणार आहे.

आज सकाळपासून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. फोर्ट, CSMT, चर्चगेट, पूर्व द्रुतगती महामार्ग यांसारख्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलिसांनी वाहतुकीवर विविध निर्बंध लागू केले आहेत.

जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना शिस्त राखण्याचे आवाहन करताना, मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तरीही आझाद मैदान व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची उपस्थिती दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *