सातारा हिल मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल – पोलीस प्रशासनाचे आवाहन

दि. 14 सप्टेंबर रोजी सातारा शहरात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे.

स्पर्धेचा मार्ग

स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून होणार असून त्यानंतर खालील मार्गाने स्पर्धा पार पडेल:
पोवई नाका → मरिआई कॉम्प्लेक्स → शाहू चौक → अदालत वाडा → समर्थ मंदिर बोगदा → यवतेश्वर → प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पुढे ५०० मीटरवर वळण → पुन्हा समर्थ मंदिर → अदालत वाडा → नगरपालिका → शाहू चौक → मरिआई कॉम्प्लेक्स → पोवई नाका → पोलीस परेड ग्राउंड.

या मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशामक दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग

वाहतुकीसाठी खालील पर्याय उपलब्ध असतील:

  • शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गाने येणारी वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी. कदम मार्केट – राधिका सिग्नल मार्गे शहरात प्रवेश करतील.
  • बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून येणारी वाहने जिल्हा परिषद चौक, कनिष्क हॉल चौक, रिमांड होम मार्ग, जुना आर.टी.ओ. चौक किंवा बांधकाम भवन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुथा चौक मार्गे शहरात प्रवेश करतील.
  • मुख्य बसस्थानक, राधिका सिग्नल व तहसील कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने शहराबाहेर जाऊ शकतील.
  • सज्जनगड, ठोसेघर व परळी बाजूकडून येणारी वाहने शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे प्रवेश करतील.
  • कास बाजूकडून येणारी वाहने मॅरेथॉन संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजूकडून शहरात येणार नाहीत; ती एकीव फाटा, मोळेश्वर, कुसुंबीमुरा, कुसुंबी व मेढा मार्गे शहरात प्रवेश करतील.

पार्किंग व्यवस्था

स्पर्धेकरीता येणाऱ्या स्पर्धक व नागरिकांनी खालील ठिकाणी आपली वाहने पार्क करावी:

  • प्रशासन इमारतीसमोरील मोकळ्या मैदानात
  • जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद ग्राउंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर
  • जुना आर.टी.ओ. चौक ते वाढे फाटा जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस
  • निर्मला कॉन्वेंट विद्यालय व सदर बाजार परिसरातील रस्त्याच्या एका बाजूस

पोलीस प्रशासनाने नागरिकांनी वाहतुकीस सहकार्य करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

vishwasprakashdigital@gmail.com

Related Posts

घर की छत पर लगे सोलर पैनल के साथ उत्तर प्रदेश में प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना के तहत बढ़ती सौर ऊर्जा स्थापना को दर्शाता दृश्य।

उत्तर प्रदेश सोलर रूफटॉप | पीएम सूर्य घर योजना में यूपी बना देश का नंबर-1 राज्य

उत्तर प्रदेश सोलर रूफटॉप स्थापना के मामले में देश का अग्रणी राज्य बन गया है। प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना के...

Read out all
गुरुग्राम जिला अदालत परिसर में बना आधुनिक टावर ऑफ जस्टिस भवन, जिसका उद्घाटन भारत के मुख्य न्यायाधीश सूर्यकांत द्वारा 12 जुलाई को किया जाएगा।

गुरुग्राम टावर ऑफ जस्टिस | नौ साल बाद मिला आधुनिक न्यायिक परिसर, 12 जुलाई को होगा उद्घाटन

गुरुग्राम टावर ऑफ जस्टिस का वर्षों से चल रहा इंतजार अब खत्म होने जा रहा है। जिला अदालत परिसर में बने इस...

Read out all
खंभात की खाड़ी पर प्रस्तावित कल्पसर परियोजना का प्रतीकात्मक दृश्य, जिसमें समुद्री बांध, जल संरक्षण और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर दिखाया गया है।

डच तकनीक से बदलेगी गुजरात की तस्वीर, कल्पसर परियोजना को मिली नई रफ्तार

प्रधानमंत्री Narendra Modi के नीदरलैंड दौरे के बाद गुजरात की महत्वाकांक्षी कल्पसर परियोजना को नई ऊर्जा मिली है। भारत और नीदरलैंड के...

Read out all
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और यूएई राष्ट्रपति के बीच रणनीतिक साझेदारी, रक्षा और ऊर्जा सहयोग पर चर्चा का दृश्य।

पीएम मोदी यूएई दौरा | रक्षा, तेल और निवेश समझौतों से मजबूत होंगे भारत-यूएई संबंध

प्रधानमंत्री Narendra Modi का हालिया United Arab Emirates दौरा भारत-यूएई संबंधों के लिए बेहद अहम माना जा रहा है। इस दौरान दोनों...

Read out all
एक मतदान केंद्र के बाहर बड़ी संख्या में खड़े मतदाता, जो बंगाल रिकॉर्ड मतदान को दर्शाते हैं

बंगाल रिकॉर्ड मतदान | 92% वोटिंग ने रचा लोकतंत्र का नया इतिहास

बंगाल रिकॉर्ड मतदान ने तोड़ा पुराना रिकॉर्ड इस बार विधानसभा चुनाव में बंगाल रिकॉर्ड मतदान ने देशभर का ध्यान खींच लिया है।...

Read out all